पुढारी वृत्तसेवा
चुकीच्या पद्धतीने केलेला आय मेकअप डोळ्यांमध्ये जळजळ, ॲलर्जी आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो.
एक्सपायरी डेट संपलेले प्रॉडक्ट्स वापरू नका
जुने काजळ, मस्कारा आणि आयलायनरमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि सूज येण्याचा धोका असतो. मस्कारा साधारणपणे दर तीन महिन्यांनी बदलणे योग्य ठरते.
दुसऱ्यांचे आय मेकअप प्रॉडक्ट्स वापरणे टाळा
मैत्रिणींचे काजळ, मस्कारा किंवा मेकअप ब्रश वापरण्याची सवय डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. एकमेकांचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.
डोळ्यांच्या आतील भागात काजळ लावू नका
डोळ्यांच्या आतील कडेवर काजळ किंवा आयलायनर लावल्याने तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथींच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे आणि दृष्टी धूसर होण्याचा धोका.
आय मेकअप न काढता झोपू नका
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप काढणे अत्यंत आवश्यक आहे. मेकअप तसाच ठेवल्यास पापण्यांजवळील ग्रंथी बंद होऊन डोळ्यांची जळजळ आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
डोळ्यांजवळ चमकदार ग्लिटर लावणे टाळा
डोळ्यांच्या अगदी जवळ ग्लिटर किंवा हलक्या दर्जाचे आयशॅडो वापरणे टाळा. त्यांचे बारीक कण डोळ्यांत गेल्यास कॉर्नियाला ओरखडे पडणे, जळजळ आणि ॲलर्जी होण्याची शक्यता असते.
अस्वच्छ मेकअप ब्रश वापरू नका
मेकअप ब्रशवर तेलकटपणा, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे आय मेकअपसाठी वापरणारे ब्रश नियमित स्वच्छ करून पूर्णपणे वाळवणे गरजेचे आहे.
रोज वॉटरप्रूफ काजळ-मस्कारा वापरणे टाळा
वॉटरप्रूफ काजळ, आयलायनर आणि मस्कारा काढण्यासाठी अनेकदा डोळे जास्त चोळावे लागतात. त्यामुळे पापण्यांची जळजळ होणे आणि पापण्यांचे केस तुटण्याचा धोका वाढतो.
महत्त्वाची सूचना : आय मेकअप केल्यानंतर डोळे लाल होणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसल्यास संबंधित प्रॉडक्टचा वापर थांबवा. त्रास कायम राहिल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.