पुढारी वृत्तसेवा
ताणतणाव आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे रात्री तासनतास झोप न येणे ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी दुधात मखाना शिजवून खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते. जाणून घेऊया याचे ६ फायदे.
मखाना आणि दुधात 'ट्रिप्टोफॅन' असते, ज्यामुळे शरीरात स्लीप हार्मोन तयार होते. तसेच यातील मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते.
मखाना आणि दूध हे दोन्ही कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. यांच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात.
मखान्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि दुधातील प्रोटीन शरीरात कोलाजन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
मखान्यामध्ये फायबर असते, जे पोटासाठी चांगले असते. तसेच कोमट दुधामुळे बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.
दिवसभर थकवा जाणवणाऱ्यांसाठी हे कॉम्बिनेशन उत्तम आहे. यातील पोषक घटक शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.
आयुर्वेदात मखान्याला अत्यंत पोषक मानले गेले आहे. याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि एकंदरीत आरोग्य सुधारते.
कसे बनवावे 'मखाना दूध'?
पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करून १ मूठ मखाने २-३ मिनिटे भाजून घ्या. नंतर १ ग्लास दूध, थोडे केशर आणि वेलची घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
घेण्याची योग्य वेळ
रात्री झोपण्याच्या १ तास आधी हे दूध कोमट असताना मखाने चावून खावे आणि दूध प्यावे. लहान मुलांना हे सकाळी नाश्त्याच्या वेळीही देता येते.