पुढारी वृत्तसेवा
जगभरात इंटरनेटची महत्त्वाची क्रांती झाली व जग आणखी जवळ आले.
व्हिडीओ कॉल, इन्स्टंट मेसेज, हायस्पीड इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या.
भारतातही दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जगातील एका देशात सध्या इंटरनेट नाही.
इरिट्रिया हा जगातील एक मात्र असा देश आहे, जिथे सर्वसामान्य नागरिकांसाठी थ्री जी, फोर जी वा फाईव्ह जी सारखी मोबाईल डेटा सेवा नाही.
मोबाईल फोन केवळ बेसिक व्हाईस कॉल वा एसएमएसपर्यंतच मर्यादित आहे.
इथं ‘इंटरनेट’ हा शब्दच अनेकांना ठाऊक नाही! इंटरनेट ॲक्सेस हा काही सरकारच्या अखत्यारीतील इंटरनेट कॅफेपुरताच मर्यादित आहे.
हे कॅफे केवळ राजधानीतच उपलब्ध आहेत. या कॅफेतही इंटरनेट स्पीड अत्यंत संथ आहे.
या कॅफेत जर तुम्ही एक तास इंटरनेटचा वापर केला तर काम होईल की नाही ते निश्चित नाही; पण तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागतील.