Namdev Gharal
मोहाचे झाड हे आदीवासींसाठी कल्पवृक्षच या झाडाचे अनेक फायदे असतात. पण याला खरे म्हणजे दारुचे झाड म्हणतात कारण यांच्या फुलापासून नैसर्गिकरित्या लवकर मद्य तयार होते
मोहाच्या फुलांमध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. झाडावरून जमिनीवर पडलेली फुले काही तासांत आंबायला लागतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरीत्या अल्कोहोल तयार होते.
या गोड आणि आंबलेल्या फुलांचा वास अनेक वन्यजीवांना आकर्षित करतो यामुळे अनेक प्राणी पक्षी या फुलांचे सेवन करतात व नशेत धूत होता यामध्ये हत्ती मोठया प्रमाणात ही नशा करतात
हत्तींना मोहाच्या आंबलेल्या फुलांचा आणि त्यापासून तयार होणाऱ्या मद्याचा गंध अत्यंत प्रिय असतो. ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या जंगलात हत्ती ही फुले खाऊन नशेत डुलत असल्याचे अनेक घटना घडतात.
अस्वल : उन्हाळ्यात जेव्हा मोहाची फुले गळतात, तेव्हा अस्वल ही फुले खाण्यासाठी झाडांखाली तासनतास बसून राहतात. ही फुले जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे अस्वल नशेत झुलताना किंवा झाडाखाली गाढ झोपी गेलेली आढळतात.
वानर - झाडावर बसून किंवा खाली पडून आंबलेली फुले खाल्ल्यानंतर माकडांवरही त्याचा थेट अंमल दिसतो. ते उड्या मारताना तोल जाणे, सुस्त बसून राहणे किंवा विचित्र हालचाली करताना दिसतात.
रानडुक्कर : रात्रीच्या वेळी जमिनीवर पडलेली मोहाची फुले खाण्यासाठी रानडुक्करांचे कळप येतात. जास्त फुले पोटात गेल्याने त्यांच्या हालचाली मंदावतात आणि ते नशेत सुस्त होतात.
पक्षी : पोपट, मैना आणि कबूतर आंबलेली फुले किंवा त्यांचा रस पितात. काही वेळा नशेत उडताना त्यांचा तोल जातो किंवा ते जमिनीवर पडतात.
रात्रीच्या वेळी फळांची वटवाघळेही या फुलांमधील गोड आंबलेल्या रसाकडे आकर्षित होतात.