मोहन कारंडे
महिंद्राने चौथी इलेक्ट्रिक एसयूव्ही Mahindra XEV 9S भारतात लॉन्च केली आहे. यापूर्वी XUV400, BE 6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत.
या गाडीची किंमत ₹१९.९५ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही किंमत Pack One Above 59kWh या बेस मॉडेलची आहे.
मोठी बॅटरी पॅक असलेल्या टॉप-एंड मॉडेलची किंमत ₹२९.४५ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
या गाडीचे डिझाइन काहीसे XEV 9e सारखे आहे, पण तिचा आकार XUV 700 प्रमाणे दिसतो.
इंटिरियर मात्र महिंद्राच्या सध्याच्या गाड्यांपेक्षा पूर्णपणे नवीन आहे.
महिंद्रा XEV 9S मध्ये तीन बॅटरी पर्याय आहेत: 59kWh, 70kWh आणि 79kWh.
Mahindra XEV 9S मध्ये अनेक सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. ७ एअरबॅग्स, ABS आणि EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, रिअरव्ह्यू कॅमेरा, रिअर डिफॉगर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स
१२.३-इंच टचस्क्रीन, १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, १२.३-इंच फ्रंट पॅसेंजर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, यासह अनेक महत्वाची फीचर्स देण्यात आली आहेत.