अंजली राऊत
भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी लोक शिवलिंगाची पूजा करतात. ते महादेवाचे प्रतीक आहे. लोक मंदिरे आणि घरांमध्ये शिवलिंग स्थापित करतात
मुख्य फरक म्हणजे मंदिरातील शिवलिंग मोठ्या स्वरूपात स्थापित केले जाते. तेथे नियमित प्रार्थना आणि आरती केली जाते. तर घरातील लहान शिवलिंग स्थापित केले जाते. त्याची काळजी आणि पूजेसाठी काही नियमांचे पालन केले पाहिजे.
ज्योतिषशास्त्रानुसार घरातील शिवलिंग अंगठ्याच्या आकाराचे असावे. तुटलेले शिवलिंग घरात कधीही ठेवू नये. शिवलिंग अशा प्रकारे स्थापित करा की ते ईशान्य कोपऱ्याकडे तोंड करून असेल. वास्तुनुसार, घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत. सोने, चांदी, पितळ, माती किंवा ॲल्युमिनियमपासून बनवलेले शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते.
घरात शिवलिंग असणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. कुटुंबातील सदस्यांमध्ये शांती आणि सौहार्द राखण्यास मदत होते. शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानतात
भगवान शिव निराकार असल्याने, हे शिवलिंग त्यांच्या निराकार, अनंत आणि अमर्याद स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचे निवासस्थान आहे. म्हणून, मंदिरात शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व देव-देवतांना सहजपणे पूजता येते.
मंदिरात शिवलिंगाची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते, तसेच आध्यात्मिक शांती मिळते, ज्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते.