पुढारी वृत्तसेवा
गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये अनेकदा अनेक प्रकारचे गैरसमज पाहायला मिळतात.
काही जोडप्यांचा असा समज असतो की लवकर गर्भधारणा होण्यासाठी शरीरसंबंध ठेवल्यानंतर महिलांनी किमान अर्धा तास तरी झोपून राहावे, जेणेकरून गर्भधारणेची शक्यता वाढते.
मात्र, हा केवळ एक गैरसमज असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपासना सेतिया यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.
अनेकांना असे वाटते की, संबंधांनंतर लगेच उठल्यास शुक्राणू बाहेर येतात आणि गर्भधारणा होत नाही.
यावर स्पष्टीकरण देताना डॉ. सेतिया सांगतात की, शुक्राणूंना स्त्रीच्या रिप्रोडक्टिव ट्रॅक्टपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ काही सेकंद किंवा मिनिटे लागतात.
संबंधांनंतर काही प्रमाणात वीर्य बाहेर येणे ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झोपून राहिल्याने गर्भधारणेच्या शक्यतेवर कोणताही विशेष परिणाम होत नाही.
डॉक्टरांच्या मते, पडून राहण्यापेक्षा 'फर्टाइल विंडो' ओळखणे जास्त गरजेचे आहे.
शुक्राणू स्त्री शरीरात ५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे ओव्हुलेशनच्या काळात म्हणजेच फर्टाइल विंडोमध्ये संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते.
डॉ. सेतिया सल्ला देतात की फर्टाइल विंडोची अचूक गणना कशी करावी, यासाठी महिलांनी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.
सुचना : ही माहिती सोशल मीडियावरील तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणत्याही वैद्यकीय निर्णयापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.