फुफ्फुसाचा कॅन्सर: सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची?

पुढारी वृत्तसेवा

फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

हा जगातील सर्वात जीवघेण्या कर्करोगांपैकी एक मानला जातो. दरवर्षी १ ऑगस्ट रोजी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'वर्ल्ड लंग कॅन्सर डे' साजरा केला जातो.

कॅन्सर नेमका कसा होतो?

फुफ्फुसांतील पेशींची अनियंत्रित वाढ होते. त्यातून गाठ (ट्यूमर) तयार होते आणि हा आजार बळावतो.

World Lung Cancer Day 2025

हे २ मुख्य प्रकार जाणून घ्या:

१. नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC): हा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो. २. स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC): हा प्रकार वेगाने पसरतो.

World Lung Cancer Day 2025

सुरुवातीची लक्षणे ओळखा!

  • सतत खोकला: औषधोपचार करूनही खोकला बरा न होणे.

  • कफातून रक्त: थुंकीत किंवा कफामध्ये रक्त पडणे (हा धोक्याचा मोठा इशारा आहे).

World Lung Cancer Day 2025

या बदलांकडे लक्ष द्या...

  • श्वास घेण्यास त्रास: अगदी थोडे काम केले तरी प्रचंड दम लागणे.

  • छातीत वेदना: खोकताना किंवा खोल श्वास घेताना छातीत तीव्र कळा येणे.

World Lung Cancer Day 2025

ही लक्षणेही आहेत गंभीर:

  • आवाजात बदल: अचानक आवाज घोगरा किंवा भरड होणे.

  • वजन कमी होणे: कोणतेही कारण नसताना सतत थकवा जाणवणे आणि वजन वेगाने घटणे.

World Lung Cancer Day 2025

काय सांगते आकडेवारी?

  • जगभरातील दर ५ पैकी १ कर्करोग मृत्यू हा फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे होतो.

  • दरवर्षी जगभरात २० लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळतात.

World Lung Cancer Day 2025

फक्त धूम्रपान हेच कारण नाही!

  • धूम्रपान हे याचे मुख्य कारण असले, तरी न धूम्रपान करणाऱ्यांमध्येही (Passive Smokers) सध्या हा कॅन्सर वेगाने वाढताना दिसत आहे.

World Lung Cancer Day 2025

वेळीच निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. श्वासावर प्रेम करा... वेळेवर तपासणी करा!