पुढारी वृत्तसेवा
LPG सिलेंडर बुक करताना OTP उशिरा येतोय किंवा अजिबात मिळत नाही?
हजारो युजर्स सध्या याच त्रासाला सामोरे जात आहेत.
नेटवर्क तपासा
कमकुवत नेटवर्कमुळे OTP अडकू शकतो. फोन एकदा Airplane Mode वर टाकून पुन्हा नेटवर्क सुरू करा.
DND मोड बंद करा
फोनवरील Do Not Disturb (DND) सुरू असल्यास OTP मेसेज ब्लॉक होऊ शकतो.
सेटिंग्जमध्ये जाऊन DND बंद करा.
सर्व्हर डाउन असू शकतो
एकाच वेळी खूप लोक बुकिंग करत असतील तर LPG कंपनीचा सर्व्हर स्लो होतो.
थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा.
SMS इनबॉक्स साफ करा
फोनचा मेसेज बॉक्स भरलेला असल्यास नवीन OTP येण्यात अडथळा येतो.
जुने SMS डिलीट करून जागा मोकळी करा.
Spam फोल्डर तपासा
काही वेळा OTP मेसेज थेट Spam किंवा Junk फोल्डरमध्ये जातो.
Inbox सोबत Spam फोल्डरही नक्की चेक करा.
इंटरनेटही महत्त्वाचे
कमकुवत इंटरनेट कनेक्शनमुळे ऑनलाइन बुकिंग अडकू शकते.
Wi-Fi किंवा Mobile Data व्यवस्थित चालू आहे का ते पाहा.
OTP न आल्यास पर्याय वापरा
ऑनलाइन OTP न मिळाल्यास IVR कॉल, WhatsApp किंवा एजन्सीमार्फतही गॅस बुकिंग करता येते.