पुढारी वृत्तसेवा
फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सी सध्या त्याच्या खेळासोबतच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
मेस्सी नुकताच तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता. कोलकाता आणि हैदराबाद नंतर त्याने दिल्लीत आपला दौरा पूर्ण केला.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मेस्सीचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्याला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट देण्यात आली.
मेस्सीला २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंच्या स्वाक्षरीची बॅट भेट म्हणून देण्यात आली.
या दौऱ्यादरम्यान मेस्सीच्या एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा रंगली, ती म्हणजे त्याच्या पायाचा विमा!
रिपोर्ट्सनुसार, मेस्सीच्या डाव्या पायाचा विमा तब्बल $९०० दशलक्ष इतका आहे.
भारतीय चलनात ही किंमत सुमारे ७४ अब्ज रुपये इतकी भरते. हा जगातील सर्वात महागड्या स्पोर्ट्स विम्यांपैकी एक आहे.
या अवाढव्य विम्यामुळेच मेस्सी अधिकृत सामन्यांशिवाय इतर कोणत्याही मैदानावर खेळायला उतरत नाही.
प्रदर्शनीय (Exhibition) सामन्यात दुखापत झाल्यास विमा कवच मिळत नाही, ज्यामुळे खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
गंभीर दुखापतीमुळे करिअर धोक्यात आल्यास, असा विमा खेळाडूंना आणि त्यांच्या भविष्याला आर्थिक सुरक्षा देतो.