पुढारी वृत्तसेवा
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.
त्याची पत्नी ॲन्टोनला रोक्कुझो सोबतची Love Story एका चित्रपटातील कथेपेक्षा कमी नाही.
ॲन्टोनला ही मेस्सीची बालपणीची मैत्रीण आहे. त्यांची भेट अर्जेंटिनामधील त्यांचे मूळ गाव रोसारिओ येथे झाली, तेव्हा मेस्सी फक्त पाच वर्षांचा होता.
ॲन्टोनला ही मेस्सीचा सर्वात जवळचा मित्र लुकास स्कालिया याची चुलत बहीण होती.
वयाच्या १३ व्या वर्षी मेस्सी मासिया अकादमीमध्ये सामील होण्यासाठी बार्सिलोनाला गेला. त्यामुळे दोघेजण दूर गेले. ॲन्टोनला रोसारिओमध्ये राहून शिक्षण पूर्ण करत होती.
२००५ मध्ये एका कार अपघातात ॲन्टोनाचा जवळचा मित्राचा मृत्यू झाला. तिचे सांत्वन करण्यासाठी मेस्सी रोसारिओला परत आला आणि हा क्षण त्यांच्या नात्यासाठी निर्णायक ठरला.
पुन्हा एकत्र आल्यानंतर त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. मेस्सीने जानेवारी २००९ मध्ये एका टीव्ही शोमध्ये ॲन्टोनलासोबतच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली.
त्यांना नोव्हेंबर २०१२ पहिला मुलगा थियागो तर सप्टेंबर २०१५ ला दुसरा मुलगा माटेओचा जन्म झाला.
३० जून २०१७ मध्ये बालपणीच्या या प्रियकरांनी रोसारिओमध्ये एका भव्य विवाहसोहळ्यात लग्न केले.
२०१८ ला या जोडप्याच्या घरात तिसरा मुलगा सिरो याचे आगमन झाले.