Lightning safety tips: वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

अचानक वादळी वारा आणि मुसळधार पाऊस आला तर, या काळात सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

वीज सहसा उंच वस्तूंवर कोसळते. झाडे उंच असल्यामुळे ती विजांचे पहिले लक्ष्य बनतात. त्यामुळे वादळ आणि पावसात झाडाखाली किंवा त्याच्या जवळ उभे राहणे टाळा.

मोकळ्या मैदानात किंवा गच्चीवर उभे राहू नका

वादळादरम्यान वीज पडण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे मोकळ्या मैदानात, बागेत, शेतात किंवा तुमच्या घराच्या गच्चीवर उभे असाल, तर तुमच्यावर वीज पडण्याचा धोका वाढतो.

कार किंवा बाईक चालवण्याची चूक नको!

अनेकांना वाटते की थोड्याशा वाऱ्यात गाडी चालवणे सुरक्षित आहे. पण वेगवान वादळात ड्रायव्हिंग करणे कठीण होते. वादळ सुरू होताच गाडी सुरक्षित ठिकाणी बाजूला थांबवणे कधीही फायदेशीर ठरते.

मोबाईल चार्जिंगला लावू नका

विजा कडाडताना अचानक व्होल्टेज वाढू शकतो. यामुळे मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही खराब होऊ शकतात. अशा हवामानात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा.

By Johan Swanepoel

निसर्गाच्या कोपापुढे निष्काळजीपणा करू नका. वादळ-पावसात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.