Lightning Capital of the World | जगातील अद्भूत ठिकाण की जिथे दर 2 सेकंदाला विजा चमकतात!

Namdev Gharal

आकाश भरून आले की जो सुरु होता विजांचा कडकडाट, आपल्याकडे वादळी पावसावेळी अशा घटना घडतात. काही जखमी तर काहींचा मृत्‍यू होतो

पण जगात असे एक ठिकाण आहे की जेथे वर्षातील 300 रात्री विजांचा चमचमाट होतो. म्हणूनच याला विज कोसळण्याची राजधानी म्हणतात. यातील दररोज एखादा लोळ जमिनीपर्यंत येतोच

विशेष वैशिष्ट्य सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या विजांचा कडकडाट फक्त दिसतो, पण अनेकदा त्यांचा आवाज (Thunder) ऐकू येत नाही. याला 'सायलेंट लाइटनिंग' असेही म्हटले जाते.

हे ठिकाण आहे व्हेनेजूएला देशातील माराकाइबो सरोवर हे नैसर्गिक आश्चर्य मानले जाते. याठिकाणी दर रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा चमचमाट होतो. आकडेवारीत मिनिटाला 28 ते 30

हे प्रमाण म्हणजे आकाशात दर दोन सेकंदाला अग्निवर्षावच होत असतो. याला lightning capital of the world अशी उपाधी मिळाली आहे. आणि ‘नासा’ च्या संशोधनातही सिद्ध झाले आहे.

एका अभ्यासानूसार व्हेनेझुएलाच्या माराकाइबो सरोवरात दरवर्षी अंदाजे २३३ वीज कोसळतात.लॅटिन अमेरिकेतील हे सर्वात मोठे सरोवर आहे

इतक्या मोठ्या प्रमाणात विज कोसळतात कारण येथील भौगोलिक रचना आहे. कॅरिबियन समुद्र आणि अँडीज पर्वतरांगांच्या जवळ असल्याने विजांच्या चमकण्यासाठी पोषक वातावरण तयार होते

अँडीज पर्वतरांगांमधून येणाऱ्या थंड हवेचा आणि कॅरिबियन समुद्रातून येणाऱ्या दमट हवा एकमेकांना जोरा टक्कर देतात व चक्र निर्माण हाते.

जेव्हा उबदार हवा वर येते, थंड होते आणि घनरूप होऊन मोठे उंच ढग तयार होतात, तेव्हा विजांसाठी अनुकूल वातावरण तयार होते. या प्रदेशात वारंवार वीज चमकण्याचे हेच कारण आहे.

या विजा इतक्या तेजस्वी असतात की ४०० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसतात. पूर्वीच्या काळी समुद्रप्रवासात दिशा ओळखण्यासाठी खलाशी या विजांचा वापर 'दीपगृहा'सारखा (Lighthouse) करायचे.