Namdev Gharal
तुम्हाला लायगर या प्राण्याविषयी माहीती आहे का, नर सिंह आणि मादी वाघ यांच्या संकरातून तयार झालेला प्राणी म्हणजे लायगर
याचे वैशिष्ट्ये म्हणजे लायन किंवा टायगर यांच्या पेक्षा असलेला दुपट्ट आकार, यामुळे मार्जार कुळातील हा सर्वात मोठा प्राणी ठरतो, त्याचे वजन तब्बल ४०० किलोपेक्षाही जास्त असू शकते
पण याचा जन्म हा जंगलात दोन्ही प्राण्यांच्या संगमातून होत नाही तर, तर हा लायगर हा तर केवळ प्राणीसंग्रहालयात मानवनिर्मित Crossbreeding प्रयत्नांमुळे जन्माला येतो.
लायगर दिसायला सिंहासारखा भव्य दिसतो, पण त्याच्या अंगावर वाघासारखे हलके पट्टे असतात. नर लायगरला सिंहासारखी मोठी आयाळ नसते, पण थोडीशी केस वाढलेली दिसतात.
सिंहाला सामान्यतः पाण्यात पोहायला आवडत नाही, पण वाघाला पाणी खूप आवडते. लायगरमध्ये वाघाचे हे गुण येतात, त्यामुळे त्याला पाण्यात पोहायला आणि खेळायला खूप आवडते.
लायगर हा खूप शक्तिशाली असूनही स्वभावाने प्रचंड शांत आणि सामाजिक असतो. सिंहाप्रमाणे त्याला समूहात राहायला आणि संवाद साधायला आवडते.
बहुतांश नर लायगर हे नपुंसक (Sterile) असतात, म्हणजेच ते पुढील पिढीला जन्म देऊ शकत नाहीत. मात्र, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये मादी लायगर दुसऱ्या सिंह किंवा वाघासोबत प्रजनन करू शकते.
अमेरिकेतील 'हरक्युलिस' (Hercules) नावाचा लायगर जगातील सर्वात मोठा जिवंत मांजर प्रजातीचा प्राणी म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवला गेला आहे. त्याचे वजन सुमारे ४१८ किलो आहे.
एवढ्या अवाढव्य शरीराला ऊर्जा देण्यासाठी हरक्युलिस दररोज साधारण ९ ते ११ किलो चिकन किंवा बीफ (मांस) खातो. एकाच वेळी तो आणखी जास्त मांस खाऊ शकतो.
शरीराने प्रचंड वजनदार असूनही हरक्युलिस आळशी नाही. तो ताशी ८० किलोमीटर (50 mph) वेगाने धावू शकतो, जो एका सामान्य वाघाच्या वेगाच्या बरोबरीचा आहे.
त्याची एकूण लांबी ३.३३ मीटर (१३१ इंच) म्हणजेच साधारण ११ फीट इतकी आहे, खांद्यापर्यंत त्याची उंची १.२४ मीटर (४९ इंच) म्हणजेच साधारण ४ फूट आहे. तो जेव्हा मागच्या पायांवर उभा राहतो, तेव्हा त्याची उंची ११ फुटांपेक्षा जास्त होते.
जर नर वाघ (Male Tiger) आणि मादी सिंह (Female Lion) एकत्र आले, तर त्यांच्या पिल्लाला 'टायगॉन' (Tigon) म्हणतात. टायगॉन हा लायगरपेक्षा आकाराने खूप लहान असतो.