चहाची सवय सोडल्यावर शरीरात होतात 'हे' ७ मोठे बदल!

पुढारी वृत्तसेवा

सुरुवातीला जाणवू शकतो त्रास

चहा अचानक बंद केल्यावर सुरुवातीचे काही दिवस डोकेदुखी, थकवा, चिडचिड आणि तणाव जाणवू शकतो.

कॅफिनचा परिणाम कमी होतो

कॅफिनची सवय सुटताना मेंदूतील रक्तप्रवाहात बदल होतात. त्यामुळे काही काळ अस्वस्थ वाटू शकते.

काही दिवसांत शरीर जुळवून घेते

बहुतेक लोकांमध्ये ही लक्षणे 2 ते 9 दिवसांत कमी होतात आणि शरीर नव्या सवयीशी जुळवून घेते.

पचन सुधारण्यास मदत

विशेषतः रिकाम्या पोटी दुधाचा चहा टाळल्यास गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास कमी होऊ शकतो.

वजन कमी करण्यास मदत

दूध आणि साखरयुक्त चहा कमी किंवा बंद केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

लोहाचे शोषण सुधारू शकते

चहातील टॅनिनमुळे लोह आणि काही खनिजांचे शोषण कमी होऊ शकते. चहा कमी केल्यास हे शोषण सुधारण्यास मदत होऊ शकते.

चहा हळूहळू कमी करा

चहा अचानक बंद करण्याऐवजी हळूहळू कमी केल्यास कॅफिन विथड्रॉवलची लक्षणे कमी जाणवू शकतात.