पुढारी वृत्तसेवा
आरोग्यदायी आहाराची सुरुवात करा
आरबट-चरबट आणि जंक फूड टाळा. शक्यतो घरचे ताजे जेवण खा.
बाहेरचे खाणे कमी करा
काही दिवस हॉटेल व फास्टफूडपासून दूर राहिल्यास पचन सुधारण्यास मदत होते.
सकाळची सुरुवात पाण्याने करा
उठल्यानंतर भरपूर पाणी प्या. यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते.
रोज चालणे आणि व्यायाम
दररोज किमान २ किमी चालण्याची आणि नियमित व्यायामाची सवय लावा.
अंकुरित कडधान्यांचा समावेश करा
सकाळच्या नाश्त्यात अंकुरित कडधान्ये खा. त्यासोबत ड्रायफ्रुट्सही घ्या.
फळे खायला विसरू नका
केळे आणि सफरचंद यांसारखी फायबरयुक्त फळे पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात.
हिरव्या भाज्या आणि डाळी खा
दुपारच्या जेवणातील निम्मा भाग हिरव्या भाज्या व डाळींनी भरलेला असू द्या.
त्रिफळा चूर्णाचा विचार करा
दीर्घकाळ पोट साफ न होण्याची समस्या असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्रिफळा चूर्ण घेऊ शकता.
रात्रीच्या सवयी सुधारा
सायंकाळी फिरा, रात्रीचे जेवण लवकर करा, जेवणानंतर किमान एक तासाने झोपा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाळा.