हिवाळ्यातही तुळस सुकणार नाही, करा फक्त 'हे' काम

पुढारी वृत्तसेवा

तुळशीच्या रोपाला आलेल्या मंजिऱ्या वेळोवेळी छाटून टाका. त्यामुळे रोपाची चांगली वाढ होण्यास मदत होते.

रोपाच्या मातीची हलक्या हाताने खुरपणी करा. त्यामुळे माती मोकळी राहते.

एक लिटर पाण्यात थोडासा गूळ, हळद पावडर, २ कापूर वड्या पाण्यात मिसळून ते मिश्रण तयार करा.

तयार केलेले मिश्रण तुळशीच्या रोपाच्या मुळांशी घाला. मात्र, पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

पाण्याच्या या मिश्रणामुळे रोपट्याची चांगली वाढ होईल, तसेच तुळस हिरवीगार राहील.

अतिशय थंडी असल्यास रात्रीच्या वेळी तुळशीचे रोप सुती कापडाने झाकून ठेवा.

तुळशीच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.

कुंडीतील माती कोरडी वाटल्यास गरजेनुसार रोपट्याला पाणी देत रहा. पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्या.