Lemur|नशा करणारा प्राणी

Namdev Gharal

हा आहे लिमूर हा (Primates) गणात मोडणारा प्राणी आहे. हा माकडापेक्षा वेगळा असतो

या प्राण्याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हा नशा करतो. कोणतेही पेय घेऊन नाही तर एका वेगळयाच पद्धतीने

लिमूर हा जगात केवळ मॅडगास्कर या बेटावर आढळणारा प्राणी आहे

लिमूर (Lemur) हा शतपाद (millipede) या किटकाला ‘लव्ह बाईट’ देतो व स्‍वतः नशेत जातो

लिमूर ज्‍यावेळी या millipede किटकाचा चावा घेतो त्‍यावेळी ते बेंझोक्विनोन (Benzoquinone) नावाचं रसायन सोडतात या रसायनामुळे लिमूरना हलकी नशा होते.

हे रसायन त्‍याला कीटकांना शत्रूपासून वाचवतं पण हे लिमूर मात्र याचा उपयोग नशा करण्यासाठी करतो.

हलकी बाईट घेतल्‍यानंतर तो या मिलिपीडला स्‍वतःच्या अंगावर चोळून घेतो त्‍यामुळे डास व कीटकांपासून संरक्षण त्‍याचे संरक्षण होते.

यानंतर तो त्‍या मिलीपीडसला सोडून देतो त्‍यानंतर पुन्हा लिमूरला नशा करण्याची हुक्‍की येते त्‍यावेळी तो पुन्हा मिलीपीड पकडतो

लिमूरचे हे वागणे "लव्ह बाईट" सारखं दिसतं, कारण लिमूर millipede ला प्रेमाने चावत असल्यासारखं वाटतं.

याचा अभ्‍यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी पाहिलंय की लिमूर खास करून पावसाळ्यात असं करतात, जेव्हा डासांचे प्रमाण जास्‍त असते.