पुढारी वृत्तसेवा
मॅटरनिटी फोटोशूट म्हणजे आईच्या बदलत्या रूपाचे मातृत्वाच्या भावनांचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करणे. सिनेकलाकारच नाही तर सर्वसामान्यांमध्येही मॅटरनिटी फोटोशूट करण्याकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे.
वेळ (Timing): मॅटरनिटी फोटोशूट गर्भधारणेच्या 7 व्या किंवा 8 व्या महिन्यात करणे चांगले असते, जेंव्हा पोट सुडौल दिसते.
कपडे (Attire): फोटोशूटसाठी आरामदायक कपडे निवडा, कपडे सैल किंवा स्ट्रेचेबल असावेत. ज्यामुळे पोटावर ताण येणार नाही. पोझ देताना त्रास होणार नाही.
कपड्यांचा रंग
कपड्यांसाठी गुलाबी, पांढरा, लाईट ब्ल्यू कलर निवडल्यास फोटोमध्ये सॉफ्ट एलिगंट लूक देतात. बोल्ड लुकसाठी रेड, नेव्ही, गोल्ड रंग निवडू शकता.
फोटोशुटसाठी रोमँटिक, कॅज्युअल, किंवा फॅमिली थीम निवडू शकता. यामध्ये सोलो (Solo): फक्त आईचे फोटो. कपल्स (Couples): पती-पत्नी मिळून काढलेले फोटो. फॅमिली (Family): इतर मुलांसोबत काढलेले फोटो.
ठिकाण (Location): आउटडोअर (निसर्गरम्य), इनडोअर (स्टुडिओ), किंवा घरातील आरामदायक वातावरण.
चांगल्या फोटोग्राफरची निवड करा जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल.