पुढारी वृत्तसेवा
चिकूच्या सालीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जर तुम्ही चिकू सोलून खात असाल तर अनेक महत्त्वाचे पोषक घटक काढून टाकता.
अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळवायचे असेल तर चुकूनही साली काढू नका.
चिकू खाण्याची योग्य वेळ : सकाळी उपाशीपोटी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी खाणे योग्य.
रात्री उशिरा चिकू खाणे टाळावे, कारण त्यातील नैसर्गिक साखर झोपेवर परिणाम करू शकते.
चिकू हे मुलांसाठी अतिशय पौष्टिक फळ आहे. हे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वरित ऊर्जा देते.
मात्र, मुलांना चिकू खायाला देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ज्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी चिकू खाणे टाळावे.
ज्यांना खाज, सूज किंवा अॅलर्जीची समस्या आहे त्यांनीही चिकू खाणे टाळावे. वरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे इतकाच हेतू आहे. तज्ञांचा सल्ल्यानेच सेवन करावे.