Weight loss tips: रात्रीच्या जेवणातील 'या' एका चुकीमुळे वजन वाढू शकते

पुढारी वृत्तसेवा

निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग्य वेळी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विशेषतः रात्रीच्या जेवणाची वेळ आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करते.

रात्रीचे जेवण नेमके कधी करावे किंवा झोपण्याच्या किती तास आधी करावे, याबाबत अनेकदा लोकांच्या मनात संभ्रम असतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करावे.

याचे मुख्य कारण म्हणजे अन्न पचायला वेळ लागतो. तुम्ही झोपण्यापूर्वी लगेच जेवलात, तर पचनक्रिया मंदावते; ज्यामुळे पोटदुखी आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

झोपताना आपले शरीर फारसे सक्रिय नसते, त्यामुळे चयापचय क्रिया देखील मंदावते.

अशा स्थितीत, उशिरा खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्याऐवजी ते चरबीच्या स्वरूपात शरीरात साठू लागते. परिणामी, वजन वाढण्याचा धोका वाढतो.

संध्याकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जेवण्याची सवय सर्वोत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही रात्रीच्या जेवणासाठी सर्वात आदर्श वेळ मानली जाते.

लवकर जेवल्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.