निलेश पोतदार
मुंबईतील लाडका लालबागचा राजा गणपती भक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला.
यंदा लालबागच्या राजाचा संपूर्ण दरबार हा चांदीच्या नक्षीकामाने सजवण्यात आला आहे.
मुख्य प्रवेशदाराजवळ दक्षिण भारतातील मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
त्या मंदिरावर भगवान शंकराची भव्य प्रतिमा बसवली आहे.
हा गणेशोत्सव १९३४ मध्ये सुरू झाला. त्यावेळी मुंबईतील लालबाग परिसर हा मच्छिमारांची वसाहत होता.
येथील लोक बऱ्याच काळापासून कायमस्वरूपी बाजारपेठेची मागणी करत होते. पण ती मागणी पूर्ण होत नव्हती.
या कामगारांनी आणि स्थानिक लोकांनी मिळून गणेशाची स्थापना केली आणि पहिल्यांदाच येथे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करण्यात आली.
लोकांनी गणपती बाप्पाच्या चरणांवर श्रद्धा ठेवली. ती मागणी पूर्ण झाली. हळूहळू येथील गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली.
येथील लोकांची मागणी पूर्ण झाल्यानंतर या परिसराला आणि गणपतीला 'लालबागचा राजा' असे नाव पडले.
लालबागचा राजा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. लालबागच्या राजाची ख्याती साऱ्या देशभर पसरली.