अभिनेत्री क्रांति रेडकर सोशल मीडियावर अॅक्टिव असते.अलीकडे सिनेमात तिचे दर्शन कमी होत असले तरी व्लॉगच्या माध्यमातून ती संवाद साधत असते.अलीकडेच तीने पती समीर वानखेडे यांच्यासह तिरूपति बालाजीचे दर्शन घेतले.यादरम्यान काही व्हीडियो तीने शेयर केले आहेत.यावेळी पती समीरबाबत बोलताना ती म्हणते, ‘देवा हा प्लीज सगळ्या फोटोत हसू दे'.या व्हीडियोच्या कमेंटमध्ये चाहते तिच्या सेन्स ऑफ ह्युमरचे कौतुक करत आहेत.पतीच्या दक्षिणेतील पोस्टिंगमुळे तिरूपतिच्या दर्शनाचा योग आला असे ती म्हणाली.या फोटोंमध्ये क्रांतिने साऊथ इंडियन लूक केला आहे . यात ती कमालीची सुंदर दिसते आहे