पुढारी वृत्तसेवा
तांदूळ धुताना किंवा उकळताना त्यातील स्टार्च पाण्यात मिसळतो. त्यात अँटिऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड्स, बी, सी आणि ई जीवनसत्त्वे यांसारखे घटक असतात
तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावून रात्रभर ठेवून सकाळी चेहरा स्वच्छ धुतल्यास त्वचेची लवचिकता सुधारण्यास, मुरुमे आणि पुटकुळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते
तांदळाच्या पाण्यात कोरफडीचा गर मिसळूनही वापरल्यास त्वचेला अतिरिक्त पोषण मिळण्यास मदत होते
त्वचेतील अतिरिक्त तेलनिर्मिती नियंत्रित करण्यास, छिद्रे स्वच्छ ठेवण्यास आणि मुरुमांचा धोका कमी करण्यास तांदळाचे पाणी फायदेशीर ठरते
तांदळाचे पाणी टोनर म्हणून वापरता येते किंवा रोजच्या फेसमास्कमध्ये मिसळून लावल्यास त्वचा अधिक निरोगी, उजळ आणि कमी तेलकट दिसण्यास मदत होऊ शकते
तांदळातील पाण्यातील घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास, त्वचेची जळजळ कमी करण्यास आणि त्वचेचे नैसर्गिक संरक्षणात्मक आवरण निरोगी ठेवण्यास मदत करते
तांदळाच्या पाण्यातील स्टार्चमुळे त्वचेला शांत आणि सुखद अनुभव मिळू शकतो. विशेषतः हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो
तांदळाचे पाणी हा नैसर्गिक घटक असून त्वचेसाठी त्याचे दुष्परिणाम तुलनेने कमी असल्याचे मानले जाते
तांदळाचे पाणी प्रत्येकाच्या त्वचेला अनुकूल असेलच असे नाही. त्यामुळे चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूस थोडे लावून चाचणी करावी