Korean glass skin face pack: कोरियन मुलींसारखी ‘ग्लास स्किन’ हवी असेल तर घरी फेस पॅक कसा बनवायचा?

पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही काळापासून स्किन केअरच्या जगात कोरियन ब्युटी टिप्स आणि प्रोडक्ट्स खूप ट्रेंडिंग आहेत.

कोरियन ब्युटी इंडस्ट्रीला मेकअपचे केंद्र मानले जाते. येथील लोक नेहमी नवनवीन तंत्रे शोधत असतात जेणेकरून त्यांचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करता येईल.

शीट मास्क, ड्यूई मेकअप आणि ग्लास स्किनने कोरियन स्किन केअरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि आता हे भारतातही खूप प्रसिद्ध होत आहे.

प्रत्येकाला त्यांच्यासारखी त्वचा हवी असते. लोक कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत.

आज आम्ही तुम्हाला एका होममेड फेस पॅकची रेसिपी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोरियन ग्लास स्किन मिळवू शकता.

लागणारे साहित्य:

हा कोरियन फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज लागेल, ज्या तुम्हाला घरी सहज मिळतील: तांदूळ, अळशीच्या बिया (Flax seeds)

कसे बनवावे?

सर्वात आधी तांदूळ आणि अळशीच्या बिया समप्रमाणात घ्या.

त्यांना एकत्र बारीक करून त्यांची पावडर तयार करा.

पावडर चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्यात गरम पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.

जेव्हा ही पेस्ट पूर्णपणे थंड होईल, तेव्हा ती चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर सुमारे १५ ते २० मिनिटे राहू द्या.

त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. हा फेस पॅक तुम्ही दररोज वापरू शकता. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल.

हा पॅक चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. जर तुमची त्वचा ॲलर्जिक किंवा संवेदनशील असेल, तर वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.