आमसुलाचं सार! पित्तावर जालीम उपचार... कसे बनवाल

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे अमृत - आमसुलाचे सार!

पित्ताचा त्रास वारंवार होतोय? मग हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

कोकमामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.

ओले खोबरे, लसूण आणि हिरव्या मिरचीचे खमंग वाटण तयार करून घ्या.

साजूक तुपात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्या.

त्यात कोकमाचा अर्क आणि तयार वाटण एकत्र करा.

चवीनुसार थोडा गूळ आणि मीठ टाकून एक छान उकळी येऊ द्या.

तयार आहे तुमचे चविष्ट, पाचक आणि आरोग्यदायी आमसुलाचे सार!

येथे क्लिक करा...