Namdev Gharal
मेल कोडियाक अस्वल ( mail kodiak bear ) हे जगातील सर्वात मोठ्या अस्वलांच्या प्रजातींपैकी एक आहे
हे मुख्यतः अलास्का (Alaska) मधील Kodiak Archipelago या बेटसमूहात आढळतात
याचे वैशिष्ठ्य म्हणजे याचे वजन ७०० किलोपर्यंत असते. चार पायांवर असल्यावर ५ ते ५.५ फूट उंच असते
याचे महाकाय रुप हे अस्वल दोन पायांवर उभे राहिल्यास दिसते. यावळी सहजच याची १० फुट उंची होते ही एखाद्या दैत्यासारखी वाटते
कोडियाक अस्वल सर्वभक्षक (omnivore) असते. विशेषतः सॅल्मन मासे, गवत, फळे, बेरीज मृत प्राण्यांचे मांस ही हे खातात
एवढे वजन असूनही हे खूप चपळ असतात. ताशी ४०–५० किमी वेगाने धावू शकण्याची क्षमता असते.
माणूस जर याच्या समोर आला तर माणसाला काही सेकंदांपेक्षा जास्त तग धरणे जवळजवळ अशक्य आहे.
कोडियाक अस्वलाचा एक फटका मनुष्याची कवटी किंवा बरगड्यांची हाड मोडू शकतो.
सायबेरीअन वाघाबरोबर याची झुंज लावली तर वाघालाही सहजपणे मात देण्याची क्षमता या अस्वलाची असते
या सर्व गोष्टींमुळे कोडियाक अस्वल पृथ्वीवरील सर्वात बलवान शिकारींपैकी एक ठरते