पुढारी वृत्तसेवा
ऑस्ट्रेलियात एक छोटा गोंडस प्राणी आढळतो जो दिवसातील 22 तास झोपून काढतो. तोही झाडांच्या फांदीवर कोणत्याही स्थितीत ते एकदम नशा केल्यासारखे
Koala हा प्राणी छोट्या अस्वलासखा दिसत असला तरी. तो मुळ कांगारु प्रजातीतील आहे.
याची दिनचर्या म्हणजे दिवसातील 18 ते 22 तास झोपणे, कारण याला कारणीभूत आहे याचा आहार
हा प्राणी युकलिप्टस नावाच्या झाडांची पानेच खातो ही पाने विषारी असतात. त्यामुळे त्याचे पचन खूपच जड असते परिणामी याला नशा आल्यासारखे होते
पण प्रत्यक्षात हा प्राणी नशा करत नाही. या या पानांच्या आहारामुळे हा मंद राहतो तसेच खूप काळ झोपल्यामुळे याला जास्त उर्जेची गरज पडत नाही.
कोआला चालताना किंवा बसताना खूप स्लो असतो. तसेच तो दिवसभर झोपतो त्यामुळे लोकांना तो नशा केल्यासारखा वाटतो पण प्रत्यक्षात त्याने नशा केलेली नसते.
याचा मेंदू हा शरिराच्या मानाने खूपच लहान असतो. त्यामुळे म्हणून त्याच्या हालचाली मंद, ऊर्जा कमी खर्च करणाऱ्या असतात.
पण हा दिसायला खूपच गोंडस असतो एखाद्या कार्टन पात्रासारखा गुलाबी नाक आणि मोठे मऊ कान तसेच ओलसर नाकामुळे सुगंध ओळखण्यात तरबेज असतो.
याला तीक्ष्ण नखे असल्यामुळे झाडांवर चढण्यात पारंगत असतो. कांगारुप्रमाणे याचे पिल्लू आईच्या पिशवीत 6 महिने राहते