Kishanghar: राजस्थानच्या वाळवंटातील 'स्वित्झर्लंड' व्हायरल पण सत्य काय?

Namdev Gharal

भारतातील वाळवंटी राज्य म्हणजे राजस्थान.तेथील एका गावात बर्फवृष्टीसारखं दृश्य दिसते, असा दावा व्हायरल व्हिडिओत केला जातो.

अजमेर जिल्हयातील किशनगड हे गाव चर्चेत आहे. पण खरे म्हणजे हे आहे मार्बल इंडस्ट्रिचे डंपिंग ग्राउंड आणि यथे आणून टाकली जाते मार्बल कटींग करुन राहीलेला स्लरी किंवा पांढरी पावडर

पण या पांढऱ्या शुभ्र मार्बलच्या स्लरीमुळे हे डंपिंगग्राऊंड जणू बर्फचा आभास निर्माण करते. जणू वाळवंटातील बर्फवृष्टीच.

भारतातील सर्वात जास्त मार्बल प्रोसेसिंग युनिट किशन गड मध्ये आहेत या मार्बल कटींग करताना काही वेस्ट प्रोडक्ट निघतात

राजस्थानच्या उष्ण हवामानातही हे ठिकाण एखाद्या बर्फाच्छादित प्रदेशासारखे पांढरेशुभ्र दिसते.

हे नैसर्गिक डोंगर नसून मार्बलची स्लरीचे डोंगर अनेक वर्षांपासून साचलेल्या या पांढऱ्या पावडरने आता डोंगराचे रूप घेतले आहे.

काही हिंदी चित्रपटांचं शूटिंगही या ठिकाणी झाल्याचा दावा केला जातो.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी अनेक जण इथे पोहोचतात.

या परिसरात साचलेले पाणी मार्बलच्या पांढऱ्या रंगामुळे गडद निळे दिसते, जे पर्यटकांना आकर्षित करते. पण आरोग्यासाठी हे हानिकारक आहे.

येथे पर्यटकांना फिरण्यासाठी 'किशनगड मार्बल असोसिएशन'च्या कार्यालयातून एक पास घ्यावा लागतो (जो विनामूल्य असतो).

सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य सर्वात सुंदर दिसते. दुपारी कडक उन्हात पांढऱ्या रंगामुळे डोळ्यांवर लख्ख प्रकाश पडतो, त्यामुळे गॉगल वापरणे आवश्यक ठरते.

हे ठिकाण अजमेरपासून साधारण ३० कि.मी. अंतरावर किशनगड येथे स्थित आहे. पण काही तज्ञांच्या मध्ये ही पांढरी पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आरोग्यासाठी घातक ठरु शकते