King Cobra | जगातील एकमेव साप जो घरटे तयार करुन अंडी देतो!

Namdev Gharal

नागांचा राजा म्हणजेच किंग कोब्रा हा असा साप आहे जो जगातील विषारी सापांमध्ये सर्वात मोठा असतो. याच्या बाबतीत अनेक रहस्य संशोधकांना अजूनही सापडतात.

हा साप स्वजातभक्षक असतो म्हणजे याचा आहार म्हणजे इतर साप यामध्ये धामण, स्पेक्टिकल कोब्रा, असे सर्वप्रकारचे विषारी व बिनविषारी साप तो खातो

या सापाचे अजून एक रहस्य म्हणजे य सापाची मादी ही अंडी घालण्यापूर्वी स्वताचे घरटे तयार करते. हे जगात कोणत्‍याही प्रकारच्या सापाला शक्य नसते

किंग कोब्राचे घरटे म्हणजे अशी जागा निवडतो जिथे योग्य आद्रता व तापमान असेल, या ठिकाणचा पाला पाचोळा, काड्या, गवत किंग कोब्रा आपल्या वेटोळ्यांनी एकत्र करतो

हा एकत्र केलेला ढिग छोट्या डोंगरासारखा दिसतो, हे घरटे तयार झाल्यावर मादी किंग कोब्रा यामध्ये २० ते ४० अंडी घालते

अंडी घातल्यावर पुन्हा ती अंडी आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करुन झाकून टाकते, सुरक्षेसाठी हे काम ती करते, तसेच अंडी उबवण्यासाठी याची गरज असते

हा पालापाचोळा हळहळू सडतो या प्रक्रियेमध्ये यामध्ये उष्णता तयार होते त्‍यानेच अंडी उबवली जातात. अंडी उबवण्यासाठी त्‍याला स्वताच्या शरीराच्या उष्णतेची गरज लागत नाही

ही अंडी उबवण्यासाठी साधारणात ६० ते ९० दिवस लागतात. या काळात मादी या घरट्या जवळ खडा पहारा देते. यावेळी ती अत्‍यंत आक्रमक असते

अंडी उबवण्याच्या काही दिवस आधी ही मादी घरटे सोडून जाते. कारण या संपूर्ण काळात तिने काहीही खाल्लेले नसेच आणि अंड्यातून बाहेर पडणारी स्वताची पिल्ले ती खाऊ शकते

असे करण्यासाठी निसर्गच तिला भाग पाडतो कारण हा साप स्वजात भक्षक असल्यामुळे तिला जाणवते व पिली बाहेर पडण्याच्या अगोदरच काही दिवस ती घरटे सोडून जाते