पुढारी वृत्तसेवा
लहान मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
हे महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध ‘मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
डिकिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, मोठ्या मुलांच्या तुलनेत लहान किशोरवयीन मुले सोशल मीडियामुळे लवकर मानसिक दबावाखाली येतात.
सोशल मीडियावरील आभासी जग आणि तिथल्या कंटेटमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.
वाढता धोका ओळखून ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकरण आता युनायटेड किंगडम (UK) देखील करत आहे.
सोशल मीडियाचा अतिवापर मुलांच्या मानसिक आरोग्याला स्पष्ट आणि अत्यंत गंभीर धोका निर्माण करत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईमवर पालकांनी वेळीच नियंत्रण ठेवणे आता अत्यंत गरजेचे आहे.