किडनी स्टोनचा त्रास आहे? मग 'हे' पदार्थ खाणे टाळाच

मोनिका क्षीरसागर

पालकमध्ये 'ऑक्झलेट'चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोन वेगाने वाढू शकतो; त्यामुळे पालकाचे अतिसेवन टाळावे.

टोमॅटो खाताना त्यातील बिया काढून टाकाव्यात, कारण या बिया स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

आहारात मिठाचे (सोडियम) प्रमाण जास्त असल्यास शरीरात कॅल्शियम जमा होते, जे पुढे स्टोनचे रूप घेते.

कार्बोनेटेड पेये आणि कोल्ड ड्रिंक्समधील फॉस्फोरिक ॲसिड किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात.

कॅफिनचे अतिसेवन शरीरातील पाणी कमी करते (Dehydration), ज्यामुळे स्टोनची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

जास्त प्रोटिनयुक्त मांसाहारामुळे लघवीमध्ये युरिक ॲसिड वाढते, जे स्टोनसाठी कारणीभूत ठरते.

काही ड्रायफ्रूट्स (उदा. काजू) आणि चॉकलेटमध्ये ऑक्झलेट असते, त्यामुळे स्टोनचा त्रास असताना हे पदार्थ कमी खावेत.

या सर्व गोष्टी टाळण्यासोबतच दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिणे हा किडनी स्टोनवर सर्वात सोपा उपाय आहे.

<strong>येथे क्लिक करा...</strong>