पुढारी वृत्तसेवा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी खूप महत्त्वाचे काम करते. ती रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ (Toxins) बाहेर काढते.
ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवणे, पीएच पातळी संतुलित करणे आणि शरीरासाठी अनेक हार्मोन्स तयार करणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.
म्हणूनच, आपल्याला किडनीच्या आरोग्याची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
किडनीला फिल्टर करण्यासाठी पाण्याची गरज असते. कमी पाणी प्यायल्यास वेस्ट मटीरियल जमा होतात, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढते, ज्यामुळे किडनीवर अनावश्यक ताण येतो आणि तिची कार्यक्षमता कमी होते.
जास्त दारूमुळे रक्तदाब वाढतो, जो किडनीला नुकसान पोहोचवतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन किडनीतील रक्तप्रवाह कमी होतो.
पुरेशी झोप न घेतल्यास हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे मधुमेह आणि बीपीची समस्या वाढते, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार वेदनाशामक (Pain Killers) औषधे घेतल्यास किडनीला गंभीर आणि कायमस्वरूपी नुकसान पोहोचू शकते.
काय कराल किडनी वाचवण्यासाठी?
पुरेसे पाणी प्या.
मीठ कमी करा.
मद्य/तंबाखू टाळा.
पुरेशी झोप घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.