Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ इशारे, जाणून घ्या लक्षणे

पुढारी वृत्तसेवा

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम किडनी करते. लघवीमध्ये होणारे बदल हे तुमच्या किडनीच्या आरोग्याचा प्राथमिक संकेत असू शकतात.

जर लघवी केल्यानंतर साबणासारखा किंवा बिअरसारखा फेस बराच वेळ राहत असेल, तर सावधान! हे लघवीतून प्रोटीन बाहेर पडण्याचे लक्षण असू शकते.

जेव्हा किडनीचे फिल्टर कमकुवत होतात, तेव्हा शरीरातील आवश्यक प्रथिने (प्रोटीन) लघवीवाटे बाहेर पडू लागतात, ज्याला 'प्रोटीन्यूरिया' म्हणतात.

लघवीचा रंग अचानक गडद पिवळा होणे हे शरीरातील डिहायड्रेशन किंवा विषारी घटक साचल्याचे संकेत असू शकतात.

जर लघवी स्वच्छ न दिसता गढूळ दिसत असेल, तर हे किडनीचे फिल्ट्रेशन खराब झाल्याचे किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते.

रात्री वारंवार उठून लघवीला जावे लागत असेल, तर किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याचे हे एक मोठे संकेत आहे.

जेव्हा किडनी लघवीला योग्य प्रकारे Concentrate करू शकत नाही, तेव्हा वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते.

लघवीला अमोनियासारखा तीव्र उग्र वास येत असल्यास, ते शरीरात घाण साचल्याचे किंवा किडनीच्या खराब कार्यक्षमतेचे लक्षण असू शकते.

यापैकी कोणतेही बदल सतत जाणवत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि किडनीची तपासणी करणे कधीही श्रेयस्कर.