आजच्या धकाधकीच्या जीवनात किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. .मात्र, खबरदारी घेतल्यास आपण किडनी कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. .तंबाखू, सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करा. तंबाखू हा किडनी कॅन्सरसाठी सर्वात मोठा धोका मानला जातो..शरीराचे वाढलेले वजन अनेक आजारांना निमंत्रण देते. आपला 'बीएमआय' नेहमी १८.५ ते २४.९ या मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा..रोजच्या जेवणात फळे, पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. 'रेड मीट'चे सेवन कमीत कमी ठेवा. .उच्च रक्तदाब किडनीवर ताण निर्माण करतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला रक्तदाब नियमित तपासा आणि तो नियंत्रणात ठेवा..कामाच्या ठिकाणी किंवा परिसरात घातक रसायने किंवा प्रदूषकांशी संपर्क येत असल्यास योग्य ती खबरदारी घ्या. .शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसातून पुरेसे पाणी पिऊन शरीर 'हायड्रेट' ठेवा..डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे वारंवार घेऊ नका. या औषधांचा किडनीवर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो..जर तुमच्या कुटुंबात कोणाला किडनीचे आजार असतील, तर वेळीच डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक त्या चाचण्या करून घ्या.