कियारा आडवाणीचा आज ३१ जुलै रोजी वाढदिवस आहे.ती सिंधी हिंदू फॅमिलीमधील असून तिचे खरे नाव आलिया आहे.तिने आपले शालेय शिक्षण द कॅथेड्रल, जॉन काननों विद्यालयातून घेतले आहे.इयत्ता १२ वी मध्ये तिला ९२ टक्के गुण मिळाले होते.यानंतर तिने मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली .रोशन तेजा इन्स्टिट्यूट, अनुपम खेर स्कूल ऑफ ॲक्टिंगमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले .यानंतर फग्ली (२०१४) चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.पण एम एस धोनी चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली.सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ती नव्या घरात शिफ्ट झाली.बांद्रामधील त्या घराची किंमत ७० कोटी रुपये आहे.तिच्याकडे ऑडी A8 L,मर्सिडीज-बेंज E220D,BMW X5,BMW 530D गाड्या आहेत.रिपोर्टनुसार, कियारा २२ कोटी संपत्तीची मालकीण आहे.ती प्रत्येक महिन्याला २५ लाख रुपयांहून अधिक कमाई करते.चित्रपटासाठी ३ कोटी तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटी रुपये घेते.कियाराकडे मुंबईमध्ये एक आलीशान १५ कोटींचे अपार्टमेंट आहे.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.