Khus Grass | जगातील सर्वात महागडे अत्तर ‘या’ गवतापासून तयार केले जाते, निद्रानाश दूर करणारा सुगंध!

Namdev Gharal

वाळा गवत (Khus Grass) हे जगातील सर्वात सुंगधी गवत मानले जाते. परफ्यूम जगतातील ‘हिरवे सोने’ म्हटले जाते

खसपासून बनवलेले शुद्ध अत्तर जगातील सर्वात महागड्या आणि मौल्यवान नैसर्गिक सुगंधी द्रव्यांपैकी एक मानले जाते.

वाळा हे एक सुगंधी गवत आहे, ज्याला इंग्रजीत Vetiver किंवा Khus म्हणतात. या गवताच्या मुळांना अप्रतिम, शांत करणारा मातीसारखा सुगंध असतो.

Chanel, Tom Ford, Guerlain सारखे जगप्रसिद्ध लक्झरी परफ्यूम ब्रँड्स त्यांच्या प्रीमियम परफ्यूम्ससाठी वाळ्याच्या तेलाचा 'बेस नोट' म्हणून वापर करतात.

याचे वैशिष्ट्ये म्हणजे याचा नैसर्गिक सुंगध आजतागायत प्रयोगशाळेमध्ये तयार करता आलेला नाही. त्‍यामुळे मोठ्या कंपन्यांना नैसर्गिक खस तेलावरच अवलंबून राहावे लागते

तब्बल १०० किलो वाळ्याच्या सुक्या मुळांवर प्रक्रिया केल्यानंतर फक्त ५०० ग्रॅम ते १ किलो शुद्ध तेल मिळते! केवळ काही थेंब अत्तरासाठी प्रचंड प्रमाणात मुळांची आवश्यकता असते.

खसपासून बनवलेले शुद्ध अत्तर जगातील सर्वात महागड्या आणि मौल्यवान नैसर्गिक सुगंधी द्रव्यांपैकी एक मानले जाते. अस्सल खस अत्तराची किंमत १०-१२ ग्रॅमला किंवा १० मिलीला हजारो रुपयांत मोजावी लागते.

यासह आपल्यापकडे पारंपरिक औषधी म्हणून याचा उपयोग केला जातो, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या माठात वाळ्याची मुळे टाकल्यास पाणी थंड आणि सुवासिक होते.

उन्हाळ्यात पित्त कमी करणे, अंगाची आग थांबवणे आणि शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी वाळ्याचे पाणी गुणकारी ठरते. वाळ्याचे तेल आणि अर्क त्वचेचा तेलकटपणा कमी करतो.

वाळ्याचा सौम्य सुगंध मज्जासंस्थेला शांत करतो. निद्रानाश (अनिद्रा), अतिविचार आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी वाळ्याचे तेल ॲरोमाथेरपीमध्ये वापरले जाते.

वाळ्याची मुळे जमिनीत खूप खोलवर (८ ते १० फूट) पसरतात. यामुळे जमिनीची धूप थांबते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.