पुढारी वृत्तसेवा
कस्तुरी हा इतिहासापासून सुगंधी पदार्थ म्हणून ओळखला जाणारा पदार्थ आहे.
त्याचा सुगंध तीव्र, उबदार आणि बराच काळ टिकणारा मानला जातो.
नैसर्गिक कस्तुरी ही कस्तुरी मृगाच्या नराच्या शरीरातील musk pod मधून मिळते.
कस्तुरी मृगाच्या नैसर्गिक अधिवासात घट, शिकारीमुळे या प्रजातींवर मोठा दबाव आला.
पूर्वी कस्तुरीचा वापर अत्तर, परफ्यूम, सुगंधी पदार्थ, पारंपरिक औषध पद्धतींमध्ये केला जात असे.
नैसर्गिक musk मध्ये असलेला muskone हा प्रमुख सुगंधी घटकामुळे प्रचंड सुवास असतो
वन्य कस्तुरी मृगांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक कस्तुरीचा व्यापार, वापरावर निर्बंध आहेत.
त्यामुळे परफ्यूम उद्योगात synthetic musk मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
कस्तुरीचा सुगंध आकर्षक असला तरी त्यामागे वन्यजीव संरक्षणाची मोठी कहाणी आहे.
‘नैसर्गिक कस्तुरी’च्या नावाने मिळणाऱ्या उत्पादनांबाबत सावध राहणे महत्त्वाचे आहे.