Kardai Bhaji : थंडीच्या दिवसात करा करडईचा आहारात समावेश, मिळेल पोषक तत्वांचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

करडई ही काहीशी दुर्लक्षित पालेभाजी आरोग्यासाठी खूप महत्‍वाची असते, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्यास दिवसात ती स्थानिक मंडई हमखास मिळते

पीक कोवळे असताना (काटे येण्याआधी) त्याची पाने खुडून भाजी म्हणून खाल्ली जाते, यामध्ये लोहाचेप्रमाण खूप असते यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढून अ‍ॅनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

या भाजीत कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण उत्तम असते. त्यामुळे हाडांची घनता वाढून सांधेदुखी आणि हाडांचे विकार दूर राहतात.

करडईतील अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहून हृदयविकाराचा धोका घटतो.

यात मुबलक प्रमाणात डाएटरी फायबर असते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते. परिणामी जुनाट बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या तक्रारी दूर होतात.

व्हिटॅमिन 'सी' आणि इतर आवश्यक खनिजांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ही भाजी खाल्ल्यावर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

यात व्हिटॅमिन 'ए' आणि बीटा-कॅरोटीन मुबलक असल्याने दृष्टी सुधारते. डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा आणि मोतीबिंदूचा धोका कमी होण्यास मदत होते.

करडईच्या पानात दाहकविरोधी गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील अंतर्गत सूज आणि सांध्यांमधील वेदना कमी होण्यास आराम मिळतो.