Kamdhenu Cow Vastu: घरात कामधेनु गायीची मूर्ती ठेवण्याचे ५ मोठे फायदे

पुढारी वृत्तसेवा

हिंदू धर्मात कामधेनु गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. सर्व इच्छा पूर्ण करणारी ही दिव्य गाय सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

पौराणिक कथांनुसार, कामधेनु गायीचा उगम समुद्रमंथनातून झाला असून, तिच्यात सर्व देवी-देवतांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळेच घरामध्ये कामधेनुची मूर्ती ठेवणे अत्यंत फलदायी ठरते.

मात्र, याचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ती योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार, कामधेनुची मूर्ती पूर्ण, सुबक आणि कोठेही खंडित नसावी. गायीचा चेहरा शांत आणि प्रसन्न असावा.

पितळ, संगमरवर किंवा मातीची मूर्ती घरासाठी सर्वोत्तम मानली जाते. प्लास्टिकची मूर्ती ठेवणे टाळावे. मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे ओरखडे किंवा तडा गेलेला नसावा.

वास्तुशास्त्रानुसार, कामधेनुची मूर्ती ठेवण्यासाठी ईशान्य कोपरा सर्वात उत्तम मानला जातो. या व्यतिरिक्त तुम्ही देवघरातही ही मूर्ती स्थापित करू शकता.

कामधेनुची मूर्ती कधीही अंधाऱ्या जागी ठेवू नका. बेडरूम किंवा बाथरूमच्या जवळ ही मूर्ती ठेवणे वास्तुदृष्ट्या अयोग्य मानले जाते.

घरात कामधेनु गायीची मूर्ती असल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. या मूर्तीमुळे कुटुंबात मानसिक शांतता लाभते आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

जर आपल्या घरातील मूर्ती तुटलेली असेल, तर ती त्वरित विसर्जित करावी. खंडित मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते.