Kamali Vijaya Babar: 'कमळी'चा ग्लॅमरस लूक; विजया बाबरचे स्टायलिश फोटो पाहा

पुढारी वृत्तसेवा

झी मराठी पुरस्कार २०२५ नामांकन पार्टीमध्ये 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर हिने तिच्या स्टायलिश अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मालिकेतील साधी आणि निरागस 'कमळी'ने काळ्या रंगाचा एलिगंट आणि ग्लॅमरस मिडी ड्रेस परिधान केला होता.

ड्रेसच्या खांद्यावरील बो-डिझाईन आणि स्कर्टच्या तळाशी असलेली फ्रिल डिझाईन तिच्या लूकला खास आणि आकर्षक बनवत होती.

लाल रंगाच्या पडद्यासमोर तिची ही 'ब्लॅक ब्युटी' आणखीनच उठून दिसत होती.

मालिकेत साध्या वेशात दिसणारी विजया बाबर खऱ्या आयुष्यातही किती स्टायलिश आहे, हे तिच्या या लूकवरून दिसून आले.

अलिकडेच महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ 'कबड्डी' आणि मराठी संस्कृतीचा गौरव करणारा या मालिकेचा विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरवर झळकला होता.

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी ही पहिली मराठी मालिका ठरली.

एका सामान्य गावाकडच्या मुलीची स्वप्नं आणि जिद्द दाखवणारी 'कमळी'ची मालिका लोकप्रिय होत आहे.