Namdev Gharal
उज्जैनमधील श्री काल भैरव मंदिर हे जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचे आणि आश्चर्याचे केंद्र आहे.
उज्जैनच्या काल भैरव मंदिरात भगवान काल भैरवांना मुख्य नैवेद्य म्हणून मद्य (दारू) अर्पण केली जाते.
मंदिराच्या बाहेर अनेक दुकानांमध्ये फुलांच्या हारासोबत मद्याच्या लहान बाटल्या 'प्रसाद' म्हणून मिळतात. भाविक श्रद्धेने ही दारू देवाच्या चरणी अर्पण करतात.
जेव्हा मंदिराचे पुजारी मद्याने भरलेले पात्र (बशी किंवा प्लेट) काल भैरवांच्या मूर्तीच्या तोंडाजवळ नेतात, तेव्हा ते मद्य हळूहळू कमी होताना दिसते आणि काही क्षणांतच पात्र रिकामे होते.
काल भैरवांच्या मूर्तीच्या तोंडाजवळ मद्य नेल्यानंतर ते मद्य कमी होते. मात्र, ते मद्य नक्की कुठे जाते, हे आजही एक गूढ आहे.
इंग्रजांच्या काळात काही संशोधकांनी मंदिराच्या भोवती खोदकाम करून पाहिले होते की, मूर्तीच्या खाली काही पाइप किंवा गुप्त जागा आहे का जिथे हे मद्य जमा होते, परंतु त्यांना असे काहीही आढळले नाही.
आजपर्यंत विज्ञानाला हे मद्य नक्की कुठे जाते याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आजही हे एक 'दैवी रहस्य' मानले जाते.
काल भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप मानले जातात. हे मंदिर तांत्रिक आणि कपांलिक संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, जिथे मद्य अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.
काल भैरवांना उज्जैन शहराचे 'रक्षक' किंवा 'सेनापती' किंवा शहराचा कोतवाल मानले जाते. पण या मंदिराचे व मूर्तीचे रहस्य आजही विज्ञानाला सापडलेले नाही