Namdev Gharal
राजस्थानमध्ये एक जमात आहे कालवेलिया Kalbelia Tribe नावाची, आणि ही जात प्रामुख्याने जिप्सी समुदायातील आहे.
यांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे साप पडकणे, सापाचे खेळ करुन उपजिवीका करणे, पण या जमातीची एक परंपरा मात्र अंगावर काटा आणनारी आहे.
या जमातीच्या महिला डोळयांमध्ये काजळ न वापरता थेट नागाचे विष घालतात, अगदी थोड्या प्रमाणात याचे विष ते वापरतात
या जमातीतील महिला डोळ्यांची दृष्टी अधिक तीक्ष्ण करण्यासाठी आणि डोळे स्वच्छ होण्यासाठी सापाच्या विषाचा (अत्यंत सौम्य अंश) वापर करतात.
या त्यांच्या कृतीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही पण परंपरा म्हणून अनेक महिला हे करतात. मात्र त्यांचे डोळे अत्यंत आकर्षक असतात. जगभरातील फोटोग्राफर या महिलांच्या डोळ्याचे फोटो घेण्यासाठी राजस्थानात येतात
Kalbelia Tribe 'कालवेलिया' ही एक भटक्या विमुक्त जमात आहे, ज्यांना जगातील सर्वात कुशल 'सर्पमित्र' मानले जाते.
धोकादायक जीवावर बेतणार प्रयोग, वैद्यकीय शास्त्रानुसार डोळ्यांत विष घालणे हे अत्यंत प्राणघातक आहे. यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते, तरीही काही दुर्गम भागात ही प्रथा पाळली जाते.
या प्रथेसाठी सहसा कोब्रा (नाग) जातीच्या सापाच्या विषाचा वापर केला जातो. मात्र, ही पद्धत आता हळूहळू लोप पावत आहे.
याच जमातीचे 'कालवेलिया नृत्य' इतके प्रसिद्ध आहे की, २०१० मध्ये युनेस्कोने (UNESCO) त्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
कालवेलिया नृत्याचे वैशिष्ट्य? म्हणजे सापासारखी लवचिकता, काळ्या वस्त्रांमधील नृत्यांगना सापासारख्या लवलवीत हालचाली करतात. हे नृत्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.
वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे आता साप पकडण्यावर बंदी आली आहे. त्यामुळे ही जमात आता आपली उपजीविका प्रामुख्याने लोककलेद्वारे करत आहे.