concentration tips : 'फोकस' हरवलाय? ५ मिनिटांत एकाग्रता वाढवण्याच्या 'सोप्या ट्रिक्स जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

एकाग्रता म्हणजे आपल्या मनाची शक्ती एका विशिष्ट कामावर, ध्येयावर किंवा विचारावर केंद्रित करणे.

तुमचं मन एका विशिष्ट कामावरुन विचलित होत असेल तर केवळ ५ मिनिटांत हे सोपे उपाय करून, तुम्ही पुन्हा एकाग्रता पुन्‍हा साधू शकता.

सलग पाच मिनिटे दीर्घ श्‍वास घ्‍या. यामुळे तुमचे मन शांत होते. शांत मेंदू अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करतो.

अभ्‍यास किंवा कामाच्‍या टेबलवर अनावश्यक वस्तू त्वरित बाजूला करा. डेस्कवरील अनावश्यक पसारा तुमचा मानसिक गोंधळ कमी करतो.

डोळ्यांसाठी ‘२०-२०-२०’चे सूत्र... दर २० मिनिटांनी, २० फूट दूर असलेल्या वस्तूवर २० सेकंदांसाठी लक्ष केंद्रित करा. हा उपाय डोळ्यांना आराम देतो एकाग्रताही वाढवतो.

शरीरातील पाण्याची कमतरता एकाग्रता कमी करते. मन विचलित होत असेल तर एक ग्लास पाणी प्या. पाणी पिल्याने काही मिनिटांतच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

मान फिरवणे, खांद्यांना ताण देणे किंवा ३० सेकंदांसाठी सरळ उभे राहणे असे छोटे व्यायाम करा. यामुळे शरीराचा ताठरपणा कमी होतो आणि मानसिक स्पष्टता सुधारते.

पाच मिनिटांचा कोणतेही काम सलग करण्‍याचा निर्धार करा. एक छोटेसे काम निवडा ते सलग पाच मिनिटे करा. यामुळे मन पुन्‍हा एकाग्र होण्‍यास मदत होते.

येथे क्‍लिक करा.