Ganga River : 5 राज्ये अन्‌‍ 2,525 कि.मी.चा प्रवास; जाणून घ्या गंगा नदीची अद्भुत कहाणी

पुढारी वृत्तसेवा

भारतात अनेक नद्या आहेत; पण गंगा नदीचे स्थान अढळ आहे.

गंगोत्रीच्या हिमशिखरातून उगम पावणारी ही नदी केवळ एक जलस्रोत नसून, कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे.

देवप्रयागमध्ये भागीरथी आणि अलकनंदा यांच्या मीलनातून गंगेचा जन्म होतो आणि इथूनच सुरू होतो 2,525 किलोमीटरचा एक विलोभनीय प्रवास.

गंगा ही भारतातील एकमेव नदी आहे, जी मुख्यत्वे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतून वाहते.

जरी ती पाच राज्यांतून वाहत असली, तरी तिचे खोरे तब्बल 11 राज्यांपर्यंत पसरलेले आहे. यमुना, चंबळ आणि सोन यासारख्या उपनद्या गंगेला सामर्थ्य देतात.

गंगेच्या पाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची स्वयं-शुद्धीकरण क्षमता.

या पाण्यात ‌‘बॅक्टेरियोफेज‌’ नावाचे विषाणू असतात, जे हानिकारक जीवाणूंना नष्ट करतात. म्हणूनच गंगेचे पाणी दीर्घकाळ खराब होत नाही.

पश्चिम बंगालमध्ये ही नदी हुगळी आणि पद्मा अशा दोन भागांत विभागली जाते आणि शेवटी जगातील सर्वात मोठा सुंदरबन त्रिभुज प्रदेश तयार करून बंगालच्या उपसागराला मिळते.