Job Loss : अचानक जॉब गेल्यावर पहिल्या सात दिवसात करा या IMP गोष्टी, एर्क्स्पट सल्ला!

Namdev Gharal

आजकाल AI च्या जमान्यात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर येऊ लागले आहे. कंपनी अचानक एक मेल पाठवून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन थांबवत आहे

जर अचानक नोकरी गेलीच तर पहिल्या सात दिवसात काय करावे हे एस्पर्टनी सांगितले आहे

बँक बॅलन्स तपासाः जॉब गेलाच तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा बँक बॅलन्स तपासा, तुमची इन्वेस्टमेंट पैसे तपासा तुम्ही व तुमच्या कुंटुंबावर या पैशावर जगू शकतो याची क्लॅरिटी करुन घ्या

स्वतःला ब्लेम करन सोडून द्याः जॉब गेल्यावर तुम्ही पहिल्यांदा स्वताला दोष देणे सोडून द्या, कारण हा जॉब तुमच्या मुळे नाही तर काहीतरी कंपनीत काहीतरी झालय म्हणून तुमचा जॉब गेला

लूजिंग द जॉब इज ॲन इव्हेंट बट लूजिंग द डायरेक्शन इज अ चॉईसः मला कुठल्या दिशेने जायचे माझी चॉईस आहे पण माझा जॉब गेला हा माझा चाईस नव्हता पण मी म्हणून माझी दिशा बदलायची का तर नाही

सत्‍य कधीही लपवू नकाः मित्रांना, नातेवाईकांना कल्पना द्या, जॉब गेल्यावर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना समजावून सांगा

प्रायोरेटी ठरवाः जॉब गेल्यावर वेळ आहे म्हणून दिवस वाया घालवू नका, गावाकडे जावू का, अशा गोष्टींना प्रायोरेटी देऊ नका, पुढचे ध्येय काय आहे जॉब शोधायचा की नवीन प्रोफेशन, की बिझनेस याची क्लॅरीटी ठरवा

मेंटॉर, कोच ला भेटाः तुमचा जॉब गेला आहे तर यावेळी पहिले जाऊन तुमचा जो कोणी मेंटॉर, गाईड कोच कोणी असेल त्‍याला पहिले जाऊन भेटा मार्गदर्शन घ्या

नेटवर्क इज नेटवर्थः तुमचा जॉब गेला तुमचे नेटवर्क ॲक्टिव्ह करा, मित्रांना कॉल करा भेटा चर्चा करा, सल्ला घ्या नोकरीसाठी कुठे मिंत्राकडून संधी मिळते का हे पाहा, नेटवर्कच तुमचे नेटवर्थ आहे