Jasmine Gajra Mental Health : केसांत मोगऱ्याचा गजरा माळण्याचे 'हे' आहेत ९ मोठे मानसिक फायदे!

पुढारी वृत्तसेवा

सण, लग्न किंवा पूजा-पाठ... महिला केसांत गजरा आवर्जून माळतात. पण गजरा केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर याचा थेट संबंध मानसिक आरोग्याशी आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) मते, मोगऱ्याच्या फुलांचा दरवळणारा सुगंध मेंदूला तत्काळ शांतता प्रदान करण्याचे काम करतो.

मोगऱ्याचा मंद सुगंध नाकावाटे शरीरात जाताच मेंदूतील ‘सेरोटोनिन’ आणि ‘डोपामाइन’सारख्या आनंदी भावना निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी झपाट्याने वाढते.

आनंदाचे हार्मोन्स वाढल्यामुळे अस्वस्थता, भीती आणि तणाव निर्माण करणाऱ्या घटकांची पातळी लगेच कमी होते आणि मन हलके वाटते.

दिवसभराची धावपळ आणि कामाच्या ताणामुळे येणारा मानसिक थकवा तसेच शरीरातील आळस घालवण्यासाठी ताजा मोगऱ्याचा गजरा अत्यंत गुणकारी ठरतो.

अरोमाथेरपी तज्ज्ञांच्या मते, मोगऱ्यातील नैसर्गिक सुगंधी घटक मेंदूला ताजेतवाने करतात, ज्यामुळे मूड स्विंग्स आणि सतत होणारी चिडचिड नियंत्रणात येते.

आयुर्वेदानुसार मोगऱ्याच्या फुलांमध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म असतात. डोक्यावर गजरा माळल्याने टाळूला थेट थंडावा मिळतो.

मोगऱ्याचा मंद सुवास डोक्यातील नसा आणि शिरांमधील ताण कमी करतो, ज्यामुळे मायग्रेन किंवा ताणामुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

मोगऱ्याच्या सुगंधाने मज्जासंस्था शांत होते. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होऊन रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.