Namdev Gharal
चालण्याचा व्यायाम हा जगातील सर्वात सोपा आणि आरोग्यासाठी सर्वात उपयोगी असा व्यायाम, कोणत्याही वयातील गटातील हा व्यायाम अगदी सुलभ ठरतो
ही जापनिज पद्धत म्हणजे interval walking training (IWT) ही खास पद्धत जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून वापरली जाते
शिनशू युनिव्हर्सिटी, जपान येथील प्रा. डॉ. हिरोशी नोसे (Dr. Hiroshi Nose) आणि त्यांच्या टीमने (डॉ. शिझुए मासुकी यांच्या सहकार्याने २००४ मध्ये ही चालण्याची टेक्निक शोधून काढली
केवळ ३० मिनिटे असे चालून तुम्ही शरीरातील अनेक व्याधिपासून सुटका करु शकता. यामध्ये ३ - ३ मिनिटांची ५ रिपीटेशन करायची आहेत
यामध्ये वेगाने चालणे (Fast Walking) आणि हळू चालणे (Slow Walking) यांची आलटून-पालटून आवर्तनं (Intervals) केली जातात. यामुळे साध्या चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न होतात
यामध्ये ३ मिनिटे एकदम घाईने चालायचे असते, पण पळायचे नाही एवढा वेग ठेवला जातो. त्यानंतर पुढची ३ अगदी सामान्य वेगाने चालून श्वास नियंत्रणात आणायचा आहे
यामुळे हृदयाची कार्यक्षमता वेगाने सुधारते, जांघ आणि पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. नेहमीच्या संथ चालीपेक्षा तब्बल २०% ते ३०% जास्त कॅलरीज बर्न होतात.
हाय बीपी कमी होण्यास मदत, रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित राहते.तसेच दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटते
डॉ. नोसे यांनी मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांवर ५ महिने (आठवड्यातून ४ ते ५ दिवस, रोज ३० मिनिटे) असे चालण्यास लावून त्यांचे संशोधन केले.
यामध्ये शरीराची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता (VO2 Peak) १०% ते १५% वाढली. तसेच सिस्टोलिक (Systolic) रक्तदाब सरासरी ९ mmHg ने आणि डायस्टोलिक (Diastolic) रक्तदाब ५ mmHg ने कमी झाल्याचे नोंदवले गेले.
अलीकडील संशोधनानुसार (विशेषतः मेनोपॉज झालेल्या महिलांमध्ये) इंटरव्हल वॉकिंगमुळे हाडांची घनता सुधारते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) आणि हाडे ठिसूळ होण्याचा धोका कमी होतो