Japanese knife | या चाकूची धार इतकी तीक्ष्ण की केसही लिलया कापले जातात!

Namdev Gharal

जपानी चाकू हा त्‍याच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या चाकुची धार ही जगातील सर्वात तीक्ष्ण मानली जाते

इतकी तीक्ष्ण धार असते की लहान बालकाचे केसही हा चाकू सहजपणे कापू शकतो. तसेच इतका तीक्ष्ण असूनही अतिशय मजबूत असतो.

तसेच कोणताही पातळ असलेला कागद लिलया कापू शकतो, यावरुन याची धार किती तिक्ष्ण आहे हे लक्षात येते

हे चाकू सामान्यतः हाताने बनवलेले (Handcrafted)असतात, बरेच जपानी चाकू पारंपरिक कारागीर हाताने घडवतात. त्यामुळे त्यांचा दर्जा आणि किंमत दोन्ही उच्च असतात.

हे चाकू “High Carbon Steel” किंवा “Blue Steel”, “White Steel” यांसारख्या खास जपानी स्टीलपासून बनतात, जे टिकाऊ आणि अतिशय धारदार असतात

जपानी चाकूंची धार अत्यंत बारीक आणि अचूक असते, कोणत्‍याही फळावरील सालही सोलण्याची क्षमता असते.

हाताने बनवलेला हँडल (बहुतेक वेळा लाकडी) आणि ब्लेडवरील पॉलिशिंग यामुळे त्यांचा लूक आकर्षक असतो.

ब्लेड पातळ असल्याने अन्न फाटत नाही; विशेषतः मासे, भाज्या किंवा सुशी कट करताना परफेक्ट स्लाईस मिळतो.

पारंपरिक “कतान” (समुराई तलवारी) बनवणाऱ्या तंत्रानेच हे चाकू तयार केले जातात. प्रत्येक चाकू कलाकृतीसारखा असतो.

यामुळे जपानी चाकू अगदी रेझर ब्लेडसारखे धारदार असतात. अशा धारमुळे तुम्ही टोमॅटो, मासे, सुशी, कांदे, पातळ भाज्या अगदी हलक्या दाबाने कापू शकता.

शॉन, ग्लोबल, मिसानो, तोजिरो यासारख्या जापनिज कंपन्या हे वैशिष्ट्यपूर्ण चाकू तयार करतात.

मोठमोठ्या हॉटेल्समध्ये शेफ्स यांची या चाकूला विशेष पसंती देतात. शेफ याला "रेझर एज" म्हणतात.