Heart Attack: ८० टक्के हार्ट अटॅक सकाळी केलेल्या 'या' चुकीमुळं, जपानी संशोधनाचा दावा

Anirudha Sankpal

पहिली चूक

सकाळी झोपेतून जागे होताच अचानक ताडकन उभे राहणे ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे शरीरात 'इमर्जन्सी' सिग्नल जातो.

शरीराचा प्रतिसाद

अचानक उभं राहिल्यामुळे रक्तदाब (BP) वेगाने वाढतो, कॉर्टिसॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

मेंदू विरुद्ध शरीर

जाग आल्यावर मेंदू लगेच सक्रिय होतो पण शरीराला तयार व्हायला वेळ लागतो; हा ताळमेळ बिघडल्याने हृदयावर प्रचंड ताण येतो.

महत्त्वाचे ६० सेकंद

झोपेतून उठल्यानंतरचे पहिले ६० सेकंद तुमच्या मज्जासंस्थेसाठी (Nervous System) पूर्ण दिवसाचा पाया ठरतात.

जपानी प्रोटोकॉल

जागे झाल्यावर लगेच उठू नका; काही वेळ पडून राहा आणि ४ वेळा संथ व नियंत्रित श्वास घ्या.

हळुवार हालचाल

प्रथम हळूच उठून बसा, डोके थोडे झुकवलेले ठेवा आणि १० सेकंद थांबल्यानंतरच जमिनीवर पाय टेकवून उभे राहा.

संशोधनाचे निष्कर्ष

या पद्धतीचा अवलंब केल्याने ३० दिवसांत ताण देणाऱ्या हार्मोन्समध्ये ३५% घट आणि रक्तवाहिन्यांच्या त्रासात ५२% घट दिसून आली.

नैसर्गिक उपाय

यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही, फक्त शरीराच्या नैसर्गिक कार्यपद्धतीचा आदर करून सकाळी हृदयावरचा ताण टाळणे आवश्यक आहे.

आरोग्याचा मंत्र

अनेक लोक सकाळी ९ वाजेपूर्वीच आपल्या हृदयाचे नुकसान करतात; योग्य पद्धतीने उठल्यास धडधड आणि छातीतील जडपणा दूर होऊ शकतो.

येथे क्लिक करा